दुसऱ्या जातीतल्या मुलाबरोबर लग्न केलं म्हणून पित्याने मुलीवर केला बलात्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Forest

दुसऱ्या जातीतल्या मुलाबरोबर लग्न केलं म्हणून पित्याने मुलीवर केला बलात्कार

भोपाळ: दुसऱ्या जातीच्या मुलाच्या प्रेमात पडून त्याच्याशी विवाह केला म्हणून ५५ वर्षीय पित्याने पोटच्या मुलीवर बलात्कार (Rape) करुन तिची हत्या केली. मध्य प्रदेशच्या भोपाळ जिल्ह्यातील (Madhya pradesh bhopal) रतीबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील समसगडच्या जंगलात (Samasgad forest) महिला आणि तिच्या आठ महिन्यांच्या मुलाचा मृतदेह सापडला.

बाळावर (Infant) अंत्यसंस्कार करण्यासाठी म्हणून आरोपी पिता मुलीला जंगलात घेऊन गेला होता. तिथे मुलीच्या लग्नावरुन दोघांमध्ये वाद झाला. वर्षभरापूर्वी मुलीचे लग्न झाले होते. आरोपी पित्याने त्यानंतर मुलीवर बलात्कार केला आणि गळा आवळून तिची हत्या केली.

हेही वाचा: पंतप्रधान मोदींकडून अर्थ राज्यमंत्री भागवत कराडांवर कौतुकाची थाप

आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी आरोपी विरोधात हत्येचे कलम ३०२ आणि कलम ३७६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

हेही वाचा: 'पार्ट टाइम मुख्यमंत्री' या भाजपच्या टीकेला शरद पवारांचे उत्तर

"दोन दिवसांपूर्वी समसगडच्या जंगलात महिलेचा छिन-विछिन्न झालेला मृतदेह आणि मुलाचा मृतदेह आढळला" असे रतिबादचे एसएचओ सुदेश तिवारी यांनी सांगितले. तपास सुरु केल्यानंतर पोलिसांना, मृत महिलेने पळून जाऊन दुसऱ्या जातीतील मुलाबरोबर लग्न केल्यामुळे कुटुंबीय तिच्यावर नाराज असल्याची माहिती मिळाली. कुटुंबाची चौकशी केल्यानंतर पित्याने गुन्ह्याची कबुली दिली.

loading image
go to top