'सिंदूर खेला'वरून केलेल्या टीकेवर नुसरतचा मौलवींना 'करारा जवाब'

वृत्तसंस्था
Saturday, 12 October 2019

नुसरत एका दूर्गापूजेत त्या पारंपारीक पद्धतीने 'सिंदूर खेला'मध्ये सहभागी झाल्या होत्या. यावरून त्यांच्यावर त्यांच्या धरर्मातील लोकांकडून टीका झाली, यावर नुसरत यांनी 'करारा जवाब' दिला आहे.

कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ नेहमीच काहीना काही कारणाने चर्चेत असतात. नुकत्याच कोलकात्यातील दूर्गापूजेत जाऊन त्यांना नवरात्रीचा आनंद साजरा केला होता. त्यानंतर पुन्हा एका दूर्गापूजेत त्या पारंपारीक पद्धतीने 'सिंदूर खेला'मध्ये सहभागी झाल्या होत्या. यावरून त्यांच्यावर त्यांच्या धरर्मातील लोकांकडून टीका झाली, यावर नुसरत यांनी 'करारा जवाब' दिला आहे.

नुसरतचे नवरात्रीतील हे फोटो बघितले का?

कोलकातामधील चलताबागान दूर्गापूजा मंडळात नुसरत व त्यांचे पती निखील जैन 'सिंदूर खेला'मध्ये सहभागी झाले होते. यावर त्यांचे मौलवी देवबंदी उलेमा यांनी नुसरतवर टीका केली होती. 'नुसरत वारंवार अशा गोष्टी करत आहे, ज्या इस्लामच्या विरोधात आहेत. जर तिला असेच वागायचे असले तर तिने आपले नाव बदलावे' असे मौलवींनी सांगितले होते. यावर नुसरतने उत्तर देत, 'मी देवाची लाडकी मुलगी आहे. मी सर्व सणवार साजरे करेन. माणुसकी आणि प्रेमावर माझा विश्वास आहे. मी खूप आनंदी आहे. वादग्रस्त गोष्टींना व टीकेला माझ्यासाठी काही महत्त्व नाही.' असे खणखणीत उत्तर नुसरतने दिले. 

या नवरात्रीत नुसरत ठिकठिकाणी दूर्गापूजेत सहभागी झाली होती. अनेक दूर्गापूजेत तिने नृत्य केले, त्यांचे पारंपारिक वाद्यही वाजवेल. या सर्व सणाचे फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले होते. ती या परंपरा पार पाडताना अत्यंत आनंदी दिसत होती. मात्र आतापर्यंत तिने केलेल्या गोष्टींवर अनेकवेळा तिच्यावर टीका झाली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Navami Nites with @nikhiljain09 #firstdurgapuja

A post shared by Nusrat (@nusratchirps) on

नुसरतने निखिल जैन या हिंदू उद्योगपतीशी लग्न केले, त्यानंतर ती सिंदूर लावून व मंगळसूत्र घालून संसदेत गेली, तिने तिचे हनिमूनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले, तसेच अनेक हिंदू सणांमध्ये सहभागी झाली. या सर्व गोष्टींवरून इस्लाम मौलवींनी तिच्यावर टीका केली. तसेच सोशल मीडियावरही ती ट्रोल झाली होती. नुसरत बशिरहाट मतदारसंघाची खासदार आहे.    

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Simplicity is the ultimate sophistication... #DurgaPuja2019

A post shared by Nusrat (@nusratchirps) on

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Nusrat Jahan answered to Islamic Maulavi for criticism