'त्या' मुलाला पाहून नुसरत जहां यांनी मारली मिठी !

वृत्तसंस्था
बुधवार, 11 डिसेंबर 2019

नुसरत यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले असून सध्य़ा त्याचीच चर्चा सवत्र पाहायला मिळतेय. 

मुंबई : बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार नुसरत जहां नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यांच्या सुंदर फोटोंमुळे अनेकदा नुसरत चर्चेत असतात. त्याचसोबत आपल्या स्पष्टवक्तेपणामुळेही त्यांची वेगळी ओळख आहे. यानंतर नुसतर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. नुसरत यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले असून सध्य़ा त्याचीच चर्चा सवत्र पाहायला मिळतेय. 

एका लहान मुलासोबतचा फोटो नुसरत यांनी शेअर केला आहे. पण हा फोटो साधा नाहीए कारण, फोटोतील लहान मुलगा फुगे विकणारा आहे. दीड वर्षांच्या फुगे विकणाऱ्या मुलासोबत नुसरत यांनी फोटो शेअर केला. त्याला कुशीत घेत नुसरत यांनी शेअर केलेल्या फोटोला कॅप्शनमध्ये लिहिलं, 'दीड वर्षाचा हा छोट्याशा मुलगा फुगे विकत होता. या मुलाने माझा दिवस अधिक खास केला. हा मुलगा फुग्यांच्या रंगापेक्षाही जास्त रंगीत आणि गोड आहे'. 

या फोटोवर चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी भरभरुन कौतुक करत लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. 'तुम्ही खूप प्रेमळ व्यक्ती आहात', 'तुम्ही खूप छान काम केलं आहे, या मुलासाठी तुम्ही भल्याचं काम करु शकता', अशाप्रकारच्या कमेंट करत नेटकऱ्यांनी नुसरत याचं कौतुक केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Styled by @harshkhullarofficial saree by @joy_mitra jewellery by @suhana_art_and_jewels thank u for decking me up 

A post shared by Nusrat (@nusratchirps) on

खासदार नुसरत या दवाखान्यात दाखल होत्या. आता मात्र त्यांची तब्येत सुधारली असून त्या घरी परतल्या आहेत. श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांची तब्येत पूर्णपणे सुधारली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Nusrat Jahan Wins Hearts After Posting a Photo with that boy