Video : विरोधकांकडून भाजप नेत्यांवर मारक शक्तींचा वापर; म्हणून... : प्रज्ञासिंह

वृत्तसंस्था
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

'भाजप नेत्यांवर विरोधी पक्षांकडून मारक शक्तींचा उपयोग केला जात आहे. मारक शक्तीचा प्रयोग केल्यानेच भाजप नेते निधन पावत आहेत,' असा आरोप भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी केला आहे.

भोपाळ : 'भाजप नेत्यांवर विरोधी पक्षांकडून मारक शक्तींचा उपयोग केला जात आहे. मारक शक्तीचा प्रयोग केल्यानेच भाजप नेते निधन पावत आहेत,' असा आरोप भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी केला आहे. एका सन्यासाने मला सांगितले की, भाजपा नेत्यांना लक्ष केले जात आहे असा दावा प्रज्ञा सिंह ठाकूरने केला आहे.  

त्या महाराजांनी सांगितलेल्या गोष्टीचा मला विसर पडला होता. मात्र मी आज बघतेय की, आपल्या पक्षाचे नेते एकापाठोपाठ एक आपल्याला सोडून जात आहेत. त्यामुळे महाराजांनी सांगितलेलं खरं आहे का, असा प्रश्न मला पडला आहे, असे प्रज्ञासिंह यांनी सांगितले. 

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे भाजपा कार्यालयात सोमवारी माजी अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजपा नेते बाबूलाल गौर यांच्यासाठी श्रद्धांजली सभा ठेवण्यात आली होती. यात प्रदेश भाजपाच्या नेत्यांनी दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या दरम्यान भोपाळच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनीही भाजपा नेत्यांबाबत शोक व्यक्त भाजपा नेत्यांच्या मृत्यूला विरोधी पक्षाने केलेली मारक शक्तीचा प्रयोग जबाबदार असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Pradnya Singh Thakur controversial statement related to expired bjp leaders