Video : भाजप खासदाराकडून चक्क शौचालयाची स्वच्छता; व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

janardan mishra

Video : भाजप खासदाराकडून चक्क शौचालयाची स्वच्छता; व्हिडिओ व्हायरल

BJP MP Janardan Mishra News : मध्य प्रदेशातील रीवाचे खासदार जनार्दन मिश्रा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते अस्वच्छ शौचालय साफ करताना दिसत आहेत. स्वतः खासदारानींच हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यावर लोक वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भजपमध्ये खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: Mumbai : आव्हाड, शिरसाट CM शिंदेंच्या भेटीला; वादळी भेटीत काय शिजणार?

याबाबत अधिक माहिती अशी की, खासदार जनार्दन मिश्रा पीएम मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मौगंज विधानसभा मतदारसंघातील हनुमाना येथील खातखरी युवा मंडळाकडून आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. यावेळी शाळेची पाहणी करताना त्यांना शाळेतील स्वच्छतागृह अस्वच्छ असल्याचे निदर्शनास आले. ते पाहता मिश्रा यांनी क्षणाचाही विलंब न करता हे शौचालय स्वच्छ करण्यास सुरूवात केली.

हेही वाचा: Congress: गेहलोतांनी राजीनामा दिला तरी पायलटांसाठी CM पद मिळवणं सोपं नाही

स्वच्छता करताचा हा व्हिडिओ स्वतः सोशल मीडियावर टाकला असून, त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली असून, सध्या हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. मिश्रा यांनी अशा प्रकारे शौचालय स्वतः स्वच्छ केल्याचा पहिल्यांदा घडलेले नसून, त्यांनी याआधीही अनेकदा शौचालये स्वच्छ करून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला आहे. 2014 मध्ये मिश्रा यांना स्वच्छतेचे ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आले होते. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मिश्रा अनेकदा स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न करत असतात.

Web Title: Mp Rewa Janardan Mishra Seen Cleaning Toilet Video Went Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..