भारतात हिंदूंच्या मुली पळवून नेतात अन्...; साध्वीचं पुन्हा खळबळजनक वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pradnya Thakur

भारतात हिंदूंच्या मुली पळवून नेतात अन्...; साध्वीचं पुन्हा खळबळजनक वक्तव्य

दिल्ली : दोन दिवसांपूर्वी राजस्थान मधील राजगढ येथे ३०० वर्ष जुने शिवमंदीर पाडण्यात आले आहे. त्यानंतर त्याचे पडसाद उमटताना दिसत असून भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सदर घटनेचा निषेध केला आहे. या प्रकरणावर भाजपाच्या भोपाळ येथील खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

भारतात हिंदूंच्या मुलींनी पळवून नेतात आणि त्याचं लग्न लावून देतात. त्यांच धर्मांतर करतात. आम्ही मंदिराबाबत बोलायला गेलो तर ते आमच्यावर आक्रमण करतात. आम्ही मंदीरात पू़जा करायला गेलो तर आक्रमण करतात असं माध्यमांना बोलताना त्या म्हणाल्या.

मुस्लिमांवर आक्रमक बोलताना त्या म्हणाल्या की, धर्माच्या आधारावर एक देश बनला आहे तुम्ही तिकडे जा. या देशात हिंदूंना पूजेचं स्वातंत्र्य आहे आणि राहणार आहे, यासाठी आम्ही काहीही करू शकतो असं त्या माध्यमांना बोलताना म्हणाल्या.

राजस्थानमध्ये जवळपास ३०० वर्षे जुने असलेले शिवमंदीर पाडले आहे. त्या घटनेचा निषेध नोंदवत त्यांनी मुस्लीम समाजावर निशाना साधला आहे. ते हिंदूंच्या मुली पळवून नेतात आणि त्यांचं धर्मांतर करतात असा आरोप त्यांनी केला आहे. जर तुम्हाला हिंदूच्या स्वातंत्र्यावर आक्रमण करायचं असेल कर तुम्ही धर्माच्या आधारावर एक देश बनला आहे त्या देशात जा. अशा इशारा त्यांनी मुस्लिमांना दिला आहे.

Web Title: Mp Sadhvi Pragya Singh Thakur Alleges Muslim Bulldozer Rajasthan Temple

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Madhya Pradesh
go to top