Farm Law Repealed : मोदींचं मन मोठं, कायदे बनतील-पुन्हा येतील - साक्षी महाराज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोदींचं मन मोठं, कायदे बनतील-पुन्हा येतील - साक्षी महाराज

कृषी कायदे मागे घेऊन मोदींनी पाकिस्तान, खलिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्यांवर मोठा प्रहार केला असल्याचं खासदार साक्षी महाराज म्हणाले.

मोदींचं मन मोठं, कायदे बनतील-पुन्हा येतील - साक्षी महाराज

देशात कृषी कायदे मागे घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आगामी विधानसभा निवडणुकांमुळे हा निर्णय घेतला अशी टीका होत आहे. आता यावर खासदार साक्षी महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, बिल तयार होतील, त्यात सुधारणा होतील आणि पुन्हा येतील. कृषी कायदे मागे घेऊन पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान जिंदाबा, खलिस्तान जिंदाबाद घोषणा देणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावले आहेत. पंतप्रधान मोदींनी देश आणि बिल यापैकी देशाची निवड केली अशा शब्दात साक्षी महाराज यांनी मोदींच्या निर्णय़ाचे कौतुक केले आहे.

साक्षी महाराज म्हणाले की, २०२२ मध्ये उत्तर प्रदेशात भाजपला ३०० पेक्षा जास्त जागा मिळतील. शेतकऱ्यांच्या अपवित्र एकजुटीच्या मंचावरून पाकिस्तान जिंदाबाद, खलिस्तान जिंदाबाद घोषणा दिल्या जात होत्या. बिल तयार होतात, बिघडतात, पुन्हा येते. पुन्हा बिल आणण्यासाठी वेळ लागत नाही. तसंच या कायदे मागे घेण्यानं निवडणुकीवर परिणाम होणार नाही.

मोदींचे मन मोठं आहे. त्यांनी बिल की देश यापैकी देशाची निवड केली. पंतप्रधान आणि भाजपासाठी देशाला प्राधान्य दिले जाते. मोदींचा हा निर्णय पाकिस्तान जिंदाबाद, खलिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देणाऱ्यांवर जोरदार प्रहार असल्याचंही साक्षी महाराज यांनी म्हटलं.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान हे आपला मोठा भाऊ असल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलं होतं. यावरही साक्षी महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नवज्योत सिंग सिद्धूला पाकिस्तानला जाण्याचा सल्ला दिला आहे. साक्षी महाराज म्हणाले की, माझा सल्ला आहे सिद्धूंनी त्यांच्या मोठ्या भावाकडे जावं.

loading image
go to top