

jageshwarnath temple
esakal
मध्य प्रदेशातील दमोह आणि बुंदेलखंड परिसरातील रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि पर्यटनविषयक पायाभूत सुविधा विकसित करण्यावर राज्य सरकारने भर दिला आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी दमोह-सागर आणि दमोह-कटनी हे दोन प्रमुख मार्ग चार पदरी करण्याच्या प्रकल्पांसह विविध विकासकामांचा आढावा घेतला. या रस्ते प्रकल्पांसाठी साडेसहा हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.
भोपाळमधील मुख्यमंत्री निवासस्थानी आयोजित अभिनंदन कार्यक्रमात दमोह लोकसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी मुख्यमंत्री मोहन यादव यांचा सत्कार केला. या वेळी दमोह परिसरातील सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांची माहिती देण्यात आली.