Bihar Election 2020: मोदीदूत!

मृणालिनी नानिवडेकर
Wednesday, 11 November 2020

ब्राह्मण भूमीहर कायस्थ राजपूत अशी आखणी करत बिहारचे सुमारे १७ टक्के मते एनडीएला मिळू शकतात, यासाठी फडणवीसांनी रचना केली. त्याची फलनिष्पत्ती चांगल्या निकालात झाली.

बहुमत मिळवूनही शिवसेनेने वेगळी वाट चोखाळल्याने देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री झाले असतानाच बिहारची जबाबदारी त्यांना सोपविण्याचे ठरले. औपचारिक घोषणेच्या दोन एक महिने अगोदर ही माहिती फडणवीसांना कळवण्यात आली असावी, असे सूत्राचे म्हणणे आहे. कारण ते बिहारचा अंदाज घेत होते. या घोषणेनंतर बिहारात नोकरी मिळालेला एकमेव मराठी असे सोशल मीडीयावर संदेश झळकले. फडणवीस अटकेपार झेंडे रोवायला गेले असता, तेथे मोदींची सुप्त लाट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याचे रुपांतर मतपेटीत उतरवणे हेच महत्त्वाचे काम. ही बाब ध्यानात घेऊनच फडणवीस हे जेडीयूसमवेतच्या जागावाटपाच्या चर्चेत सहभागी झाले. या वेळी भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा, गृहमंत्री अमित शहा, भूपेंद्र यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. नीतिशकुमार समजूतदार सहकारी निघाले, पण लोजपचे चिराग पासवान मात्र ठाम राहिले. रामदास आठवले यांच्या मैत्रीमुळे चिराग किती प्रकाशमान आहे, याचा अंदाज फडणवीसांना आला. आता आव्हान होते कोविड काळातल्या प्रचाराचे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बिहारांच्या मतांवर १५ वर्षांच्या अॅन्टी इन्कम्बन्सीचा प्रभाव पडू नये यासाठी फडणवीसांनी आखणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास सार्थ ठरवण्याचे आव्हान होते आणि त्यात अमित शहा आजारी होते. अशा स्थितीत मतदारसंघनिहाय आढावा घेतला गेला. त्याचवेळी महाराष्ट्रात विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळणे सुरू होतेच. राज्यात आणि बिहार असे दोन्हीकडे दौरे सुरू होते. मिथिला, ब्रज अशा भागावर विशेष लक्ष होते. सुशील मोदी यांच्याशी दररोज चर्चा करून जातीय समीकरणांचा आढावा घेतला गेला. यादरम्यान फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली, मात्र त्यांनी बिहारच्या घडामोडींवर लक्ष ठेवले. नितीशकुमार यांच्या मंडळीशी संवाद सुरू होता. दारुबंदीचा मुद्दा, दहा टक्के विकासदर यासारखे महत्त्वाचे मुद्दे प्रचारात आग्रहाने मांडण्याचे चर्चेतूनच ठरले. ब्राह्मण भूमीहर कायस्थ राजपूत अशी आखणी करत बिहारचे सुमारे १७ टक्के मते एनडीएला मिळू शकतात, यासाठी फडणवीसांनी रचना केली. त्याची फलनिष्पत्ती चांगल्या निकालात झाली.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mrinalini Nanivdekar write article Devendra Fadnavis