'नृत्यसम्राज्ञी' मृणालिनी साराभाई यांना गुगलची आदरांजली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 मे 2018

आपल्या मुद्राभिनयासह पदलालित्याने जगाला मोहिनी घालणाऱ्या नृत्यांगणा मृणालिनी साराभाई यांना आज गुगलने डूडलच्या माध्यमातून आदरांजली वाहिली. गुगलने साराभाई यांच्या १०० व्या जयंती निमित्त खास डूडल साकारले आहे. 

‘अम्मा’या नावाने साराभाई या सुपरिचित होत्या. त्यांनी १८ हजारांहून आधिक शिष्यांना नृत्यकलेत पारंगत केले. या व्यासंगी कलायात्रीचा भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण या नागरी पुरस्काराने सन्मान केला. कोलकात्याच्या रवींद्र भारती विद्यापीठाने डी. लिट. तर १९९६ मध्ये मध्य प्रदेश सरकारने कालिदास सन्मान देऊन त्यांचा गौरव केला आहे. शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळवणाऱ्या एक हजार महिलांच्या यादीत मृणालिनी साराभाई यांचा समावेश आहे.

साराभाई या टागोरांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमध्ये शिकल्या. त्यांनी भरतनाट्यम आणि कथकली नृत्यप्रकारांना जागतिक स्तरावर प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. वयाच्या १२/१३ व्या वर्षी स्वित्झर्लंडमध्ये त्यांनी बॅलेचेही धडे गिरवले.

Web Title: Mrinalini Sarabhai remembered with a Google doodle on her 100th birth anniversary