MSEDCL : वर्षात तिसऱ्यांदा वीजेची दरवाढ होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSEDCL electricity tariff will increased third time in year 35 paise per unit

MSEDCL : वर्षात तिसऱ्यांदा वीजेची दरवाढ होणार

बंगळूर : एकाच वर्षात तीन वेळा वीजदरवाढ करून वीज मंडळाने ग्राहकांना मोठा शॉक दिला आहे. एप्रिलमध्ये सरासरी ३५ पैसे प्रति युनिट आणि जूनमध्ये २५-३० पैसे प्रति युनिट वाढ झाली होती. त्यात आता एक ऑक्टोबरपासून रहिवाशांना विजेसाठी अधिक पैसे द्यावे लागणार आहेत.
कर्नाटक वीज नियामक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोळशाचे वाढलेले दर आणि इतर खर्चाच्या पार्श्वभूमीवर हे दर हंगामी स्वरुपात वाढविले आहेत. राज्य विद्युत नियामक आयोगाने (केईआरसी) इंधन समायोजन शुल्काचा (एफएसी) भाग म्हणून केलेल्या बदलांमुळे यावर्षी तिसऱ्यांदा वीज दरात वाढ केली आहे. बंगळूर शहराचा समावेश असलेल्या बंगळूर इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लिमिटेड (बेस्कॉम) अंतर्गत ग्राहकांना प्रति युनिट ४३ पैसे अतिरिक्त द्यावे लागतील.

मेस्कॉमच्या व्याप्तीत ग्राहकांना २४ पैसे अधिक तर चेस्कॉमच्या ग्राहकांना ३५ पैसे, हेस्कॉम आणि जेस्कॉमच्या अंतर्गत येणाऱ्या ग्राहकांनाही प्रति युनिट ३५ पैसे अतिरिक्त मोजावे लागतील. एक ऑक्टोबर २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत हे दर लागू होतील. जमा झालेले इंधन शुल्क पूर्णपणे वसूल झाल्यानंतर ही दरवाढ मागे घेतली जाऊ शकते. कुमारस्वामींची टीका राज्य सरकारने नवरात्रीला पुन्हा विजेचे दर वाढवून शॉक दिल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला आहे. राज्य सरकार जनतेच्या बाजूने नाही, हे खरे आहे. वीजदरात सातत्याने वाढ होत असल्याबाबत गंभीर शंका घेतल्या जाऊ शकते, असे ते म्हणाले.