बंगळूर : म्हैसूर नगरविकास प्राधिकरण (MUDA Scam) घोटाळ्याच्या चौकशीला सामोरे जात असलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांच्यावर आता आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. खाण कंत्राट नूतनीकरणासाठी मुख्यमंत्र्यांनी ५०० कोटी रुपये लाच घेतल्याचा आरोप झाला आहे.