Mukesh Ambani : स्टेट बँकेने चक्क मुकेश अंबानींना टाकले मागे ; १० वर्षांचा मोडला विक्रम

Mukesh Ambani 'Trailing 12 Months' याचा हिशेब केला तरी एसबीआयने रिलायन्सला मागे टाकले
Mukesh Ambani Reliance Demerger
Mukesh Ambani Reliance DemergerSakal

Mukesh Ambani : देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांच्या श्रीमंती मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा खूप मोठा वाटा आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मौल्यवान इंडस्ट्री मानली जाते. मात्र रिलायन्स इंडस्ट्रीजचा गेल्या दहा वर्षांपेक्षा जुना असलेला विक्रम एका कंपनीने मोडला आहे.

अधिक माहिती अशी की, स्टेट बँक ऑफ इंडिया ने रिलायन्स इंडस्ट्रीजचा दहा वर्षांपेक्षा जुना विक्रम मोडला आहे. बाजार भांडवलानुसार मुकेश अंबानींची रिलायन्स कंपनी देशातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे.

Mukesh Ambani Reliance Demerger
Ruvin Dholakiya : 12 हजार कोटींच्या मालकाने नातवाला विकायला लावले कपडे, हॉटेलमध्ये बनला वेटर !

एका दशकाहून अधिक काळ ही कंपनी सर्वात फायदेशीर कंपनी राहिली आहे. तेल, दूरसंचार अशा विविध क्षेत्रात काम करणारी ही कंपनी देशातील नफा कमवणाऱ्या कॉर्पोरेट कंपनीच्या यादीत सर्वात अव्वल स्थानी आहे. मात्र आता स्टेट बँक ऑफ इंडियाने तिला मागे टाकले आहे.

Mukesh Ambani Reliance Demerger
Navi Mumbai : नवी मुंबईत 'या' ठिकाणी १२ तास होणार पाणी कपात

बिझनेस स्टॅंडर्डच्या एका वृत्तानुसार, सुरू असलेल्या आर्थिक वर्षांमध्ये म्हणजेच वर्ष 2023 24 च्या पहिल्या तीन महिन्यांच्या निकालांमध्ये एसबीआयने देशात सर्वाधिक नफा कमवला आहे. एस.बी.आय ने एप्रिल ते जून महिन्यात १८,५३७ कोटी रुपयांचा नफा कमवला आहे. तर रिलायन्सने १६,०११ कोटी रुपयांचा नफा कामाला आहे.

Mukesh Ambani Reliance Demerger
Facebook News : फेसबुक-इन्स्टावर दिसणार नाहीत बातम्या; मेटाचा मोठा निर्णय! न्यूज लिंक हटवण्यात येणार

'TTM' म्हणजे 'Trailing 12 Months' याचा हिशेब केला तरी एसबीआयने रिलायन्सला मागे टाकले आहे. गेल्या 20 वर्षांत हे दुस-यांदा घडले आहे जेव्हा SBI ने TTM नुसार सर्वाधिक नफा कमावला आहे.

Mukesh Ambani Reliance Demerger
Gautam Adani: गौतम अदानींनी विकत घेतली सिमेंट क्षेत्रातील 'ही' मोठी कंपनी, एवढ्या कोटींना झाली डील

जूनमध्ये संपत असलेल्या या टीटीएमच्या आधारे एसबीआयचा एकत्रित नफा 66,860 कोटी रुपये झाला आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा 64,758 कोटी रुपये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com