
Reliance Jio: मुकेश अंबानी पायउतार, रिलायन्स जिओला मिळणार नवा चेअरमन
उद्योगपती मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या संचालकपदावरून पायउतार केला आहे. रिलायन्स जिओ बोर्डाची 27 जून 2022 रोजी बैठक झाली. बैठकीत रिलायन्स जिओच्या बोर्डाने आकाश अंबानी यांची बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. मुकेश अंबानी यांनी 27 जूनला कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. (mukesh ambani resigns as director of reliance jio akash ambani chairman)
पंकज मोहन पवार 27 जूनपासून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. पंकज मोहन पुढील पाच वर्षे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहणार आहे. रामिंदर सिंग गुजराल आणि के.व्ही चौधरी यांची कंपनीच्या अतिरिक्त संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांनी 27 जून 2022 पासून कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी आकाश एम. अंबानी यांची गैर-कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती मंजूर करण्यात आली आहे.
Web Title: Mukesh Ambani Resigns As Director Of Reliance Jio Akash Ambani Chairman
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..