
मुख्तार अब्बास नक्वी यांचा अल्पसंख्यांक मंत्रीपदाचा राजीनामा
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आपल्या अल्पसंख्यांक मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यसभेची त्यांची मुदत संपल्यानं कॅबिनेट बैठकीनंतर त्यांनी राजीनामा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट बैठकीत नक्वी यांच्या कार्याचा गौरवही केला. (Mukhtar Abbas Naqvi resigns as Union Minister of Minority Affairs)
राज्यसभेतील भाजपच्या दोन खासदारांचा उद्या कार्यकाळ संपत आहे. यामध्ये मुख्तार अब्बास नक्वी आणि आरपी सिंह यांचा समावेस आहे. यापार्श्वभूमीवर PM मोदींच्या अध्यक्षेखाली झालेल्या बैठकीत या दोन खादारांचं मोदींनी कौतुक केलं, त्यावरुन आता हे मंत्री राजीनामा देतील असं वाटत होत. त्यानुसार, आधी नक्वी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच आरपी सिंह यांनीही आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. दरम्यान, कॅबिनेटची बैठक संपल्यांतर नक्वी यांनी थेट भाजपचं कार्यालय गाठलं आणि अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली.
हेही वाचा: महुआ मोईत्रांना शशी थरुरांचा पाठिंबा; म्हणाले, धर्म कोणी...
नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी नक्वींना कुठल्याही जागेवरुन भाजपनं उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळं त्यांना पुन्हा मंत्रीपदाची संधी दिली जाणार नसल्याचं स्पष्ट झालं होतं. पण भाजपमध्ये त्यांना इतर महत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
Web Title: Mukhtar Abbas Naqvi Resigns As Union Minister Of Minority Affairs
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..