esakal | अदानी समूहातील कंपन्या SEBI च्या रडारवर, सरकारकडून संसदेत माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam Adani

अदानी समूहातील कंपन्या SEBI च्या रडारवर, सरकारकडून संसदेत माहिती

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: अदानी समूहाच्या (Adani group companies) वेगवेगळ्या कंपन्यांची चौकशी सुरु आहे. सरकारकडून आज संसदेत ही माहिती देण्यात आली. अदानी समूहातील वेगवेगळया कंपन्यांची बाजार नियमन करणाऱ्या सेबी (SEBI) आणि सरकारच्या डीआरआयकडून (DRI) चौकशी सुरु आहे. अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी (pankaj chowdhary) यांनी आज संसदेत लिखित उत्तरात ही माहिती दिली. (Multiple Adani group companies being investigated by SEBI & DRI Finance Ministry tells Parliament dmp82)

ही बातमी आल्यानंतर अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये काही प्रमाणात घसरण दिसून आली. "सेबीच्या नियमांच्या अनुपालनाशी संबंधित अदानी समूहातील काही कंपन्यांची सेबी चौकशी करत आहे. डीआरआयकडून काही कंपन्यांची कायदेशीर मुद्यांवर चौकशी सुरु आहे" असे चौधरी यांनी सांगितले.

हेही वाचा: पावसाळी अपघातांचे झोपड्यांमधील बळी हे शिवसेनेचे पाप, प्रसाद लाडांचा घणाघात

ईडीकडून या कंपन्यांची चौकशी सुरु नसल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले. अदानी समूहातील सहा कंपन्यांची नोंदणी झालेली आहे. भारतातील मान्यताप्राप्त शेअर बाजारात या कंपन्या व्यवहार करतात. अलब्युला इनव्हेसमेंट फंड लिमिटेड, क्रेस्टा फंड लिमिटेड आणि एपीएमएस इनव्हेसमेंट फंड लिमिटेड हे तीन फंड सेबीने जून महिन्यात गोठवल्याची माहिती मंत्र्यांनी दिली.

loading image