Gujrat Election: गुजरातच्या निवडणुकीला उशीर का? आयोगानं सांगितलं कारणं, मोरबी दुर्घटना... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rajiv kumar_Gujrat Election

Gujrat Election: गुजरातच्या निवडणुकीला उशीर का? आयोगानं सांगितलं कारणं, मोरबी दुर्घटना...

गुजरात विधानसभा निवडणूक अखेर गुरुवारी जाहीर झाली. पण निवडणूक जाहीर व्हायला उशीर का झाला? याचं कारण निवडणूक आयोगानं सागितलं आहे. यामागे विविध कारणं होती त्यांपैकी मोरबी पूल दुर्घटनेचंही एक कारण असल्याचं आयोगानं सांगितलं आहे. (Multiple reasons for delay in Gujarat assembly polls announcement including Morbi tragedy says CEC)

पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, निवडणूक उशीरा जाहीर होण्यामागे विविध कारणं होती. यांपैकी नुकतीच राज्यात घडलेली मोरबी पूल दुर्घटनेचाही समावेश आहे. कारण यामुळं राज्यात काल दुखवटा पाळला गेला, अशी अनेक कारणं यामध्ये होती.

हे ही वाचा : राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

गुजरातच्या निवडणुकीला उशीर झाल्यानं काँग्रेसनं निवडणूक आयोगावर ट्विट करुन टीका केली होती. काँग्रेसनं म्हटलं होतं की, भारतीय निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था असून ते निष्पक्ष निवडणूक घेते. तसेच यापुढं या ट्विटमध्ये तीन माकडांचे इमोजी टाकले आहेत. काँग्रेसच्या या टीकेवर निवडणूक आयुक्त म्हणाले, "जे लोक टीका करत आहेत त्यांच्यासाठी निवडणुकीचे निकालही आश्चर्यचकित करणारे असू शकतील"

दोन टप्प्यात होणार निवडणूक

गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत आज घोषणा करण्यात आली आहे. ही निवडणुक दोन टप्प्यात होणार असून १ आणि ५ डिसेंबरला गुजरात निवडणूक पार पडणार आहे. तर ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. पहिल्या टप्यात ८९ मतदान पार पडणार आहे. तर दुसऱ्या टप्यात ९३ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. एकूण १८२ जागांवर निवडणूक होणार आहे.