
नवी दिल्ली - कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या कमी होत असल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आज दिल्लीचे निर्बंध (Restrictions) आणखी शिथिल केले असून त्याची अंमलबजावणी सोमवारपासून (ता. २६) केली जाणार आहे. यानुसार सिनेमागृहे, मल्टीप्लेक्सना (Multiplex) ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी (Permission) देण्यात आली आहे. तसेच मेट्रो रेल्वे देखील शंभर टक्के क्षमतेने धावणार आहेत. एवढेच नाही तर बसना देखील संपूर्ण क्षमतेसह धावण्याची मुभा दिली आहे. यापूर्वी मेट्रो आणि बस हे ५० टक्के क्षमतेने धावत होत्या. (Multiplex to be Start in Delhi)
दिल्ली सरकारच्या आदेशानुसार विवाह सोहळ्यात आता ५० ऐवजी १०० नागरिक सहभागी होवू शकणार आहेत. अंत्यसंस्कार, दफनविधी आणि संबंधित विधीसाठी शंभर जण हजर राहू शकतात. यापूर्वी केवळ २० लोकांनाच परवानगी देण्यात आली होती. रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू केली जाणार असून त्यांना सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत सेवा देता येणार आहे. शहरातील सर्व बाजारपेठ, मॉलना सकाळी दहा ते रात्री ८ पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. धार्मिक स्थळे सुरू केली असली तरी भाविकांना मात्र मनाई केली आहे. अर्थात शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.