मुंबई : भारतीय सैन्यातील जवानाचा ट्रेनच्या धडकेत मृत्यू!

Bhupendra Singh Tokas
Bhupendra Singh Tokassakal media

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय सैन्यदलातील (Indian Army) लुधीयाना युनिटच्या (Ludhiyana Unit) जवानाचा (Army Officer death) ट्रेनला धडकून मृत्यू (Train Accident) झाला आहे. मिरा रोड आणि भाईंदरच्या मध्ये रविवारी रात्री 12 च्या सुमारास ही घटना घडली. भुपेंद्रसिंह ओमप्रकाश टोकस (Bhupendra singh Tokas) असं या जवानाचं नाव आहे. तो 31 वर्षांचा होता. भुपेंद्रसिंह हा 30 नोव्हेंबरपासून बेपत्ता होता. तशी तक्रारही मुंबईच्या कफ परेड पोलीस (Mumbai Police) स्टेशनला दाखल करण्यात आली होती.

रविवारी रात्री एक व्यक्ती मिरा रोड आणि दहिसरच्या मध्ये रेल्वे ट्रॅक क्रॉस करत होता. त्यातच तो भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रेनला धडकल्याची माहिती वसई जीआरपीला मिळाली. त्यांनी त्या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. भुपेंद्रसिंह टोकस हा भारतीय सैन्यदलाच्या लुधीयाना युनिटचा जवान होता. तो राजस्थानमधल्या अल्वाच्या हरलसोली गावचा रहिवासी होता. त्याच्या घरी त्याची पत्नी आणि दोन मुली आहेत.

तो पेट्रोलियम टेक्निशियनचा कोर्स करण्यासाठी मुंबईत आला होता. 30 नोव्हेंबरला तो नेव्ही नगरच्या आर्मी युनिटमधून कुणालाही काहीही न सांगता बाहेर पडला. त्याच्या कुटुंबियांचा त्याच्याशी काहीच संपर्क न झाल्यानं त्यांच्या कुटुंबियांनी भुपेंद्रसिंहचा मित्र प्रकाश बदारा याला त्याला शोधायला सांगितलं. तो सापडला नाही, तेव्हा कुटुंबियांनी त्यालाच त्यांच्या वतीनं पोलिसात तक्रार दाखल करायला सांगितली. त्यानंतर प्रकाश बदारानं कफ परेड पोलीस स्टेशनमध्ये तो हरवला असल्याची तक्रार दाखल केली.

भुपेंद्रसिंह टोकस हरवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर आम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्याचा काहीही पत्ता लागत नव्हता. त्याचा फोनही बंद होता. नंतर रविवारी रात्री भुपेंद्रसिंह यांचा मृतदेह मिळाल्याची माहिती वसई जीआरपीकडून मिळाली, असं कफ परेडचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजकुमार डोंगरे यांनी सकाळशी बोलताना सांगितलं. भुपेंद्रसिंह हा कुणालाही न सांगता युनिट सोडून का गेला ? याचा अजून पत्ता लागलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com