
कुत्रा अन् माणसांचे विशेष नाते असते. कुत्रा आपल्या मालकासाठी काहीही करायला तयार असतो. शिवाय, कुत्र्याच्या एकदा प्रेमात पडले तर त्याला दूर करणे अवघड असते.
बिना (मध्य प्रदेश): छोटी बजरिया पोलिस ठाण्यातील कर्मचारी एका कुत्र्याची विशेष काळजी घेताना दिसत आहेत. गुन्हेगार मालकाचा कुत्रा असला तरी या कुत्र्याने चौकीतील पोलिसांना आपल्या प्रेमात पाडले आहे.
कुत्रा अन् माणसांचे विशेष नाते असते. कुत्रा आपल्या मालकासाठी काहीही करायला तयार असतो. शिवाय, कुत्र्याच्या एकदा प्रेमात पडले तर त्याला दूर करणे अवघड असते. कुत्रा अनेकांच्या घरातील सदस्य होऊन जातो. कुत्रा आणि नागरिक यांच्यामधील अनेक बातम्या समोर येत असतात. पण, एका गुन्हेगाराच्या कुत्र्याने पोलिसांना प्रेमात पाडले आहे.
मनोहर अहिरवार याने संपत्तीच्या वादातून आपल्या दोन मुलांसह पाच नातेवाईकांचा खून केला आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्याची रवानगी पोलिस चौकीत केली आहे. पण, मनोहर अहिरवार याच्या सुलतान नाव असलेल्या एका लॅब्रेडॉर कुत्र्याचे मालकावर प्रचंड प्रेम आहे. मनोहरची रवानगी कारागृहात केल्यापासून कुत्र्याने पोलिस ठाण्यातच बैठक मारली आहे. छोटी बजरिया पोलिस ठाण्यातील कर्मचारी सुद्धा या कुत्र्याच्या प्रेमात पडले असून, त्याची काळजी घेताना दिसतात.
दरम्यान, मनोहरला अटक केल्यानंतर सुलतानने अन्न आणि पाणी सोडून दिले होते. शिवाय, प्रचंड चिडला होता. पण, आता तो आमच्या कुटुंबातील सदस्य झाला आहे. पोलीस त्याच्यासाठी घरचे अन्न आणतात व खाऊ घालतात. सुलतानच्या मालकाने पाच जणांची हत्या केल्यामुळे त्याची काळजी घेण्यासाठी घरात कोणीच राहिले नसल्याने कुत्रा येथेच राहात आहे. आम्ही त्याला अन्न आणि पाणी पुरवत आहोत, अशी माहिती पोलिस स्टेशनच्या अधिकारी मनिषा तिवारी यांनी दिली.