esakal | तब्बल ३५ वर्षे चाललेल्या खटल्याचा घटनाक्रम ...  वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

raja-mansingh

भरतपूरचे राजे मानसिंह १९८५मध्ये डीग विधानसभामतदारसंघातून अपक्ष म्हणून रिंगणात होते.त्यांच्याविरोधातील काँग्रेसच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्री शिवचरण माथूर यांची प्रचारसभा२०फेब्रुवारी रोजी डीगमध्ये होती

तब्बल ३५ वर्षे चाललेल्या खटल्याचा घटनाक्रम ...  वाचा सविस्तर

sakal_logo
By
(सकाळ संशोधन आणि विकास विभाग)

राजस्थानातील राजा मानसिंह आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांची हत्या २१ फेब्रुवारी १९८५ रोजी भरतपूर येथे झाली होती. या प्रकरणात मथुरामधील जिल्हा न्यायालयाने 11 पोलिसांना मंगळवारी (ता.२१) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तब्बल ३५ वर्षे चाललेल्या खटल्याचा घटनाक्रम ... 

घटना काय घडली? 
भरतपूरचे (राजस्थान) राजे मानसिंह १९८५ मध्ये डीग विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून रिंगणात होते. त्यांच्याविरोधातील काँग्रेसच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्री शिवचरण माथूर यांची प्रचारसभा २० फेब्रुवारी रोजी डीगमध्ये होती. सभेत माथूर यांनी भरतपूरच्या राजघराण्यावर टीका केली, काँग्रेस कार्यकर्त्यांनी मानसिंहांची पोस्टर फाडली, अशी माहिती मानसिंहांना समजली. संतप्त मानसिंहांनी जीप थेट सभास्थानी नेवून सभामंच आणि माथूर यांच्या हेलिकाॅप्टरवर आदळवली. पोलिसांनी मानसिंहांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. दुसऱ्या दिवशी (२१फेब्रुवारी) काँग्रेस आणि मानसिंहांचे कार्यकर्ते यांच्यात वादाच्या भीतीने संचारबंदी जारी केली. त्याच दिवशी संचारबंदीत दिवसाढवळ्या मानसिंह हे जावई विजयसिंहांसह हरिसिंह, सुमेर सिंह, मलखान सिंह आदींसह धान्यबाजारातून जात होते. पोलिसांनी त्यांना घेरले आणि गोळीबार केला. यात मानसिंहांसह सुमेरसिंह, हरीसिंह यांचा मृत्यू झाला. वाचलेल्या विजयसिंहांनी पोलिसांनी गोळीबार केल्याची तक्रार नोंदवली. या घटनेची नोंद पोलिसांनी चकमक अशी केली होती. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यमान आमदाराचा पोलिसांकडून दिवसाढवळ्या एन्काऊंटर. घटनेनंतर माथूर यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 


कोण होते मानसिंह? 

५ डिसेंबर १९२१ - भरतपूरच्या महाराज किसनसिंह यांच्या राजघराण्यात मानसिंह यांचा जन्म 
१९२८ ते १९४२ - मानसिंहांचे इंगलंडमध्ये अभियांत्रिकी आणि इतर शिक्षण. 
१९४६-१९४७ - मानसिंह यांनी भरतपूर संस्थानचा कारभार पाहिला. 
१९४७ - मानसिंह यांचा संस्थानाच्या विलीनीकरणाला विरोध. 
१९५२ - राजस्थान विधानसभेवर अपक्ष उमेदवार म्हणून डीगमधून निवडून आले. त्यानंतर सलग सात वेळा ते अपक्ष निवडून येत राहिले. 

घटनाक्रम 

सन १९८५ 
२० फेब्रुवारी – मानसिंह यांनी मुख्यमंत्री शिवचरण माथूर यांच्या सभास्थानी असलेल्या हेलिकाॅप्टरवर गाडी आदळवली 
२१ फेब्रुवारी – मानसिंह आणि आणखी दोघांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू. 
२२ फेब्रुवारी – मानसिंहांच्या अंत्यसंस्कारावेळी हिंसाचार. पोलिसांच्या गोळीबारात तिघांचा मृत्यू. 
२३ फेब्रुवारी - माथुरांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा आणि हिरालाल देवपुरा मुख्यमंत्री. 
२८ फेब्रुवारी - तपास सीबीआयकडे दिला 
१७ जुलै – जयपूरच्या सीबीआय न्यायालयात आरोपपत्र दाखल. 
१ जानेवारी १९९० – मथुराच्या जिल्हा व सत्र न्यायालयात खटला वर्ग करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. 
९ जुलै २०२० - शेवटची सुनावणी सत्र न्यायाधीश साधना राणी ठाकूर यांच्यासमोर. 
२१ जुलै २०२० – मानसिंहांच्या हत्येबद्दल ११ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

खटल्यात दोषी ठरलेले 
तत्कालीन जिल्हा पोलिस उपअधीक्षक कानसिंह भाटी, डीगचे एसएचओ वीरेंद्र सिंह, सुखराम, हेड काॅन्स्टेबल जीवाराम, भंवरसिंह, काॅन्स्टेबल हरीसिंह, शेरसिंह, छत्तरसिंह, पद्माराम, जगमोहन, रवि शेखर. 

निधन झालेले आरोपी - नेकीराम, कुलदीप आणि सीताराम. 
दोषमुक्त - चालक महेंद्रसिंह