लवून नमस्कार न केल्याने यूपीत सरपंचाचा खून!

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 16 August 2020

लवून नमस्कार करण्यास नकार दिल्याने दलित सरपंचाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे.

लखनौ- लवून नमस्कार करण्यास नकार दिल्याने दलित सरपंचाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. एका १३ वर्षीय दलित मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच उत्तर प्रदेशात आणखी धक्कादायक घटना घडली आहे. ठाकूर समाजातील व्यक्तींना लवून नमस्कार करण्यास नकार दिल्याच्या रागातून हत्या करण्यात आल्याचे सरपंचाच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. या घटनेचे गावात पडसाद उमटले असून संतप्त जमावाने दगडफेक करत जाळपोळ केली. पोलिस चौकीचीही तोडफोड करण्यात आली. 

स्वातंत्र्यानंतर प्रथमच संसदीय अधिवेशन अत्यंत वेगळ्या स्वरूपात

सत्यमेव जयते हे आझमगडमधील बांसगावचे सरपंच होते. पहिल्यांदाच ते सरपंच झाले होते. बांसगावमध्ये उच्च जातींच्या तुलनेत मागास जातीतील लोकांची संख्या टक्क्यांनी जास्त आहे. परंतु, येथील कारभाराची सूत्रे ठाकूर समुदायाच्या हातातच आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सत्यमेव जयते हे हत्या झाली त्यादिवशी गावाबाहेर असलेल्या एका खासगी शाळेसमोरून जात होते. त्याचवेळी त्यांना त्यांचे मित्र विवेक सिंह आणि सूर्यांश दुबे हे जेवणासाठी जवळच घेऊन गेले होते. याच दरम्यान त्यांच्यात वाद झाला आणि सत्यमेव जयते यांची त्यांनी गोळ्या घालून हत्या केली. 

वैज्ञानिकांनी सांगितला कोविड-19 लक्षणांचा क्रम; मिळू शकते मोठी मदत

या घटनेनंतर गावातील दलित समुदायातील नागरिकांनी रस्त्यावर येऊन संताप व्यक्त केला. यावेळी दगडफेक आणि जाळपोळही करण्यात आली. यात आठ वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे. या घटनेविषयी आझमगड क्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुभाषचंद्र दुबे म्हणाले, “जोपर्यंत आरोपींनी अटक करून चौकशी केली जात नाही. तोपर्यंत सत्यमेव यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीप्रमाणेच तपास केला जाणार आहे. अद्याप हत्येचे कारण कळू शकलेले नाही, पण ही घटना गंभीर आहे. ”


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of Sarpanch in UP for not saluting