

Railway Minister Ashwini Vaishnaw
esakal
Eastern Railway Gatekeeper Arrest: पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १७) सकाळी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली. येथील एका रेल्वे लेव्हल क्रॉसिंगवर रेल्वे रुळ ओलांडत असलेल्या एका स्कूल व्हॅनला लोकल ट्रेनने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात व्हॅनमधील तीन विद्यार्थ्यांसह एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.