Telangana Assembly Polls : तेलंगणमध्ये मुस्लिमांमुळे काँग्रेसला अच्छे दिन; BRS कडून मतदार वळण्याची शक्यता

तेलंगणमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या १३ टक्के एवढी आहे. या मतदारांचा तेलंगणातील ११७ मतदारसंघांपैकी ४५ मतदारसंघांवर मुस्लिम मतदार परिणाम पाडत असतात.
muslim voters in telangana are likely to shift to Congress got second state in South India
muslim voters in telangana are likely to shift to Congress got second state in South Indiasakal
Updated on

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून तेलंगणमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पाहत आहे. तेलंगणमधील मुस्लिम मतदार काँग्रेसकडे वळण्याची शक्यता निर्माण झाल्याने काँग्रेसला दक्षिण भारतातील दुसरे राज्य मिळण्याचे स्वप्न पडू लागले आहे.

तेलंगणमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या १३ टक्के एवढी आहे. या मतदारांचा तेलंगणातील ११७ मतदारसंघांपैकी ४५ मतदारसंघांवर मुस्लिम मतदार परिणाम पाडत असतात. सध्या तेलंगणमध्ये आठ मुस्लिम आमदार आहेत. यात बहादूरपुरा, याकुतपुरा, चंद्रयानगट्टा, चारमिनार, नामपल्ली व मलिकपेठ या मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदारांचा प्रभाव अधिक आहे. गेल्या १० वर्षांपासून हा मतदार मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन होता.

यामुळे बीआरएसला सत्तेचा सोपान चढणे शक्य झाले. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून हा मतदार पुन्हा काँग्रेसला पसंती देऊ लागला आहे. यामुळे केसीआर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

तेलंगणमध्ये बीआरएसमध्ये चांगल्या प्रतिमेचा एकही मुस्लिम नेता नाही. मात्र, बीआरएसचा विश्वास एमआयएमच्या नेत्यांवर असतो. एमआयएमचे प्रमुख ओवेसी बंधुंच्या नेतृत्वामुळे मुस्लिम मतदार त्यांच्या पक्षाला मतदान करतो.

त्यामुळे काँग्रेसला मिळणारी मतांमध्ये विभागणी होत असल्याने बीआरएसला फायदा होत आला आहे. एमआयएमचा प्रभाव हैदराबाद व त्या लगतच्या भागावरच आहे. मुस्लिम मतदार संपूर्ण राज्यात पसरलेला आहे.

बीआरएस-भाजप छुपी युती

बीआरएस व भाजपची पडद्यामागे युती असल्याचा प्रचार आता काँग्रेसने सुरू केला आहे. ट्रिपल तलाक, ३७० वे कलम यासाठी बीआरएसने भाजपला मदत केली होती. यामुळे काँग्रेस आता उघडपणे बीआरएस व भाजप हे छुपे दोस्त असल्याचा प्रचार जोरदारपणे सोशल मीडियावर करीत आहे.

तसेच तेलंगणचे प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी यांनी मुस्लिम नेत्यांना हाताशी धरून मुस्लिम मतदारांमध्ये हे बिंबविण्याचा प्रयत्न केला आहे. एमआयएमचे ओवेसी बंधू व बीआरएस एकत्र येऊन भाजपला आतून भाजपला मदत करणारे पक्ष असल्याचे आता पटू लागल्याने मुस्लिम मतदार झपाट्याने बीआरएसकडून काँग्रेसकडे वळू लागला आहे.

काँग्रेसमध्ये असलेले मोहम्मद अली शब्बीर हे मुस्लिम नेता प्रभावी नेते मानले जातात. याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. या मुस्लिम मतदारांच्या भरवशावर काँग्रेस तेलंगणमध्ये अच्छे दिन येण्याची आस लावून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com