बंगळूर : जगप्रसिद्ध म्हैसूर दसऱ्याच्या (Mysuru Dasara) इतिहासात पहिल्यांदाच यंदा ११ दिवसांचा दसरा साजरा होणार आहे. दरवर्षी १० दिवसांचा होणारा म्हैसूर दसरा यावेळी एका दिवसाने वाढविण्यात आला. दरवर्षी नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवानंतर (Navaratri) १० व्या विजयादशमीच्या दिवशी जंबोसवारीने सांगता होत असे. तथापि, पंचमी तिथी दोन दिवसांत येत असल्याने यावेळी विजयादशमी ११ व्या दिवशी साजरी केली जाईल.