

British Era Mystery: Hidden Treasure Still Unfound in India’s Enigmatic Fort
esakal
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात गंगा नदीच्या काठावर एक असा किल्ला उभा आहे, जो आपल्या अंगाखांद्यावर हजारो वर्षांचा इतिहास घेऊन आजही दिमाखात उभा आहे. या किल्ल्याचे नाव आहे चुनारचा किल्ला. याला 'चरणाद्रि गड' असेही म्हटले जाते. मुघलांपासून ते इंग्रजांपर्यंत सर्वांनी या किल्ल्यावर राज्य केले, पण आजही या किल्ल्याबद्दल एक गूढ कायम आहे.