

Water droplets from temple roof hint at incoming rain, sparking curiosity and belief.
esakal
उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात एक असे रहस्यमयी मंदिर आहे, जे विज्ञानाच्या सर्व नियमांना आव्हान देते. हे मंदिर चक्क पावसाची अचूक भविष्यवाणी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. हवामान खात्याच्या अंदाजाआधीच हे मंदिर पाऊस कधी आणि कसा पडणार, याचे संकेत देते. जेव्हा जगभरात हवामान बदलाची चर्चा होत आहे, तेव्हा कानपूरच्या भीतरगावपासून ३ किमी अंतरावर असलेल्या भगवान जगन्नाथ मंदिराचे रहस्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.