
टाटा सन्सचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
नवी दिल्ली : टाटा समूहाने एअर इंडियाचे (Air India) नवे अध्यक्ष म्हणून नटराजन चंद्रशेखरन (N Chandrasekaran) यांची नियुक्ती केली आहे. सोमवारी पार पडलेल्या बोर्डाच्या बैठकीत चंद्रशेखरन यांच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली आहे. तत्पूर्वी, 14 फेब्रुवारी रोजी, टाटा सन्सने (Tata Sons) तुर्की एअरलाइन्सचे माजी प्रमुख इल्कर IC यांची एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्तीची घोषणा केली होती, परंतु IC यांनी ही ऑफर नाकारली होती. त्यानंतर आज एन चंद्रशेखरन यांच्या नावाची आज एअर इंडियाच्या अध्यक्षपदी घोषणा करण्यात आली आहे. (N Chandrasekaran Appointed As a Chairman of Air India)
टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रेशकरन हे कंपनीसोबत 100 हून अधिक टाटा ऑपरेटिंग कंपन्यांचे प्रमोटर असून, ऑक्टोबर 2016 मध्ये ते टाटा सन्सच्या बोर्डात सामील झाले आणि जानेवारी 2017 मध्ये त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
कोण आहेत नटराजन चंद्रशेखरन
एन. चंद्रशेखरन यांचा जन्म 1963 मध्ये मोहनूर, तामिळनाडू येथे झाला असून, त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एमसीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. चंद्रशेखरन 1987 मध्ये टाटा समूहात सामील झाले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली TCS ही टाटा समूहाची सर्वात मोठी कंपनी बनली, तसेच नफ्याच्या बाबतीत सर्वात यशस्वी ठरली. चंद्रशेखरन, ज्यांना चंद्रा या नावाने ओळखले जाते. ते टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर आणि टीसीएस सारख्या कंपन्यांच्या बोर्डाचे अध्यक्ष देखील आहेत.
Web Title: N Chandrasekaran Officially Appointed As The Chairman Of Air India
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..