Jagannath Temple : पुरीच्या जगन्नाथ मंदिरात नबजौबन दर्शनासाठी भाविकांचा प्रतिसाद, मंदिर उघडले सकाळी!
Rath Yatra : पुरी येथे भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्र यांच्या रथयात्रेच्या आदल्यादिवशी 'नेत्र उत्सव' आणि 'नबजौबन भेष' विधी सोहळ्याचा उत्साहात पार पडला. सकाळी पहाटेपासूनच भाविकांनी मंदिराच्या सिंहद्वाराजवळ गर्दी केली.
पुरी : जगन्नाथ पुरी येथे भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या रथयात्रेच्या आदल्यादिवशी रत्न बेदी येथे होणाऱ्या नबजौबन दर्शनासाठी हजारो भाविकांनी मंदिराच्या सिंहद्वाराजवळ पहाटेपासूनच गर्दी केली होती.