Rajnath Singh : वृत्तपत्र स्वातंत्र्यावर राजनाथ सिंह यांचे सूचक वक्तव्य; म्हणाले, मोदींनी मीडियावर...

आरएसएसशी संलग्न साप्ताहिक 'पांचजन्य' ने आयोजित केलेल्या परिषदेत ते बोलत होते
Rajnath Singh
Rajnath Singhsakal

संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी रविवारी काँग्रेसच्या आरोपाला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

ते म्हणाले की, वृत्तपत्र स्वातंत्र्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करणारे हे विसरतात की, भाजप सरकारने कधीही कोणत्याही माध्यम संस्थेवर कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. कोणाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर गदा आणली नाही.

आरएसएसशी संलग्न साप्ताहिक 'पांचजन्य' ने आयोजित केलेल्या परिषदेत बोलताना सिंग म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत देशात पुन्हा वाद सुरू झाला आहे.

काँग्रेसवर निशाणा साधताना, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते म्हणाले की, जुन्या पक्षाचा संपूर्ण इतिहास सर्व प्रकारच्या स्वातंत्र्यांचे उल्लंघन करण्याच्या घटनांनी भरलेला आहे.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू...

ते म्हणाले की, काँग्रेस सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश ठेवण्यासाठी घटनादुरुस्तीही केली होती. जे काचेच्या घरात राहतात त्यांनी इतरांवर दगडफेक करू नये.

सिंग यांनी असेही अधोरेखित केले की, मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि त्याचे स्वातंत्र्य लोकशाहीसाठी खूप महत्वाचे आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, आज जे मीडिया स्वातंत्र्याच्या उल्लंघनाचा आरोप करत आहेत.

ते विसरले आहेत की, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असो किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार असो, त्यांनी कधीही कोणत्याही मीडिया हाऊसवर बंदी घातली नाही. तसेच भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होत नाही.

Rajnath Singh
Mayawati : वाढदिनीच मायावतींची मोठी घोषणा; निवडणुकीत विरोधकांना बसणार मोठा फटका!

नुकत्याच घडलेल्या जोशीमठ दुर्घटनेबाबत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) अहवाल सादर केला होता. या अहवालात इस्रोने चिंता वाढवणारी माहिती दिली होती. जोशीमठमध्ये भूस्खलनाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. (joshimath land subsidence isro pulls down report)

१२ दिवसांत जमीन ५ सें.मी. जोशीमठ भूस्खलनाबाबत फोटोसहीत इस्रोने अहवाल सादर केला होता. दरम्यान केंद्र सरकारने हा अहवाल  वेबसाइटवर हटवण्यास सांगितले. 

सरकारने तज्ज्ञ संस्थांना माध्यमांशी न बोलण्याचे आणि भूस्खलनाबाबत मीडियाशी संवाद साधू नये किंवा सोशल मीडियावर डेटा शेअर करू नये, असे निर्देश दिले आहेत. दरम्यान हे अहवाल NRSC वेबसाइटवरून काढून टाकण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com