

Krishna Janmashtami
esakal
गोरखपूरच्या ऐतिहासिक गोरखनाथ मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांचा जन्म होताच मंदिर परिसरात ‘जय कन्हैयालाल की’च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गोरक्षपीठाधीश्वर योगी आदित्यनाथ यांनी जन्मोत्सवाच्या धार्मिक विधींमध्ये सहभागी होत बाळकृष्णाची पूजा केली.