विद्यार्थिनी पैज हरली अन्‌ विवस्त्र होऊन फिरली...

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

पैज हरल्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थिनीला चक्‍क रस्त्यावरुन विवस्त्र होऊन वाहन चालवावे लागले. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

बेळगाव : आतापर्यंत अनेक पैजा लावण्यात आल्याची चर्चा नेहमीच ऐकण्यास मिळते. मात्र, हरल्यास विवस्त्र होऊन शहरातून वाहन चालविण्याची पैज लज्जास्पद आहे. बेळगावमध्ये अशी घटना घडली आहे. पैज हरल्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थिनीला चक्‍क रस्त्यावरुन विवस्त्र होऊन वाहन चालवावे लागले. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे शहरवासीयांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. असा निंदनीय प्रकार करणाऱ्या महाविद्यालयीन युवक व युवतींचा शोध घेऊन पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे.

दोन दिवसांपूर्वी नेहमी गजबजलेल्या क्‍लब रोडवरील एका हॉटेलमध्ये पार्टी सुरू होती. पार्टीमध्ये मौजमस्ती करत असताना एक पैज लावण्यात आली. पैज हरल्यास विवस्त्र होऊन वाहन चालविण्याची अट होती. पैज हरलेल्या युवतीकडे विवस्त्र होऊन दुचाकी चालविण्याचा आग्रह धरण्यात आला. त्यानंतर काही वेळातच युवती विवस्त्र होऊन वाहन चालवित असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. याची शहरात एकच चर्चा सुरु झाली आहे. बेळगाव हे शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते. त्यामुळे येथील शिक्षण संस्थांमध्ये शिक्षणासाठी इतर राज्यांतून येणाऱ्या युवक व युवतींची संख्या वाढली आहे. या युवक-युवती रात्री उशिरापर्यंत पार्टी करत असतात. त्यांच्या हुल्लडबाजीचा त्रास अनेकदा बेळगावकरांना करावा लागत असतो.

रोडवरुन इतर वाहनांची वर्दळ सुरु असतानाही युवती सुरुवातीला युवकाच्या दुचाकीवर विवस्त्र होऊन मागे बसली होती. युवकाने दुचाकी थांबविल्यानंतर त्याच अवस्थेत स्वत: ती वाहन चालविते, असे व्हिडीओत स्पष्ट दिसते. पोलिसांनी संबंधित युवतीची चौकशी करुन तिच्यासह युवकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naked woman rides bike in Belagavi; video goes viral at Karnataka