जिल्ह्याला डॉ. आंबेडकरांचं नाव देण्यास विरोध; आंध्र प्रदेशात मंत्र्याचं घर जाळलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Andhra Minister House fire
जिल्ह्याला डॉ. आंबेडकरांचं नाव देण्यास विरोध; आंध्र प्रदेशात मंत्र्याचं घर जाळलं

जिल्ह्याला डॉ. आंबेडकरांचं नाव देण्यास विरोध; आंध्र प्रदेशात मंत्र्याचं घर जाळलं

अमरावती : जिल्ह्याला घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यावरुन आंध्र प्रदेशातील अमलपूरममध्ये मोठा हिंसाचार उसळला असून यामध्ये विरोधकांनी सरकारी बस आणि एका मंत्र्याचं घर पेटवून दिलं आहे. आंध्र प्रदेशातील कोनासीमा जिल्ह्याचा नामविस्तार करण्याचा निर्णय जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारनं घेतला आहे. याला काही संघटनांनी विरोध केला आहे. (name of Dr. BR Ambedkar given to Konaseema District of AP Minister house set on fire)

आंध्र प्रदेशात काही दिवसांपूर्वी जिल्ह्यांचं विभाजन करण्यात आलं आणि १३ नव्या जिल्ह्यांची निर्मिती झाली. यांपैकी कोनासीमा जिल्ह्याचा नामविस्तार करण्याचं आंध्र सरकारनं ठरवलं. या जिल्ह्याचं नव नामकरण डॉ. भीमराव रामजी आंबेडकर कोनासीमा जिल्हा असं करण्यात आलं आहे. या जिल्ह्याचं मुख्यालय अमलापुरम हे निश्चित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी १८ मे रोजी नोटिफिकेशन काढलं होतं आणि जिल्ह्यातील रहिवांशांचे आक्षेप मागवले होते. त्यांतर तीन दिवसांनंतर अंतिम नोटिफिकेशन काढलं.

दलित संघटनांनी मागणी केली होती की जिल्ह्याच्या नावापूर्वी डॉ. आंबेडकरांचं नाव देण्यात यावं तर इतर काही संघटनांनी आंबेडकर यांच्या नावाला विरोध केला होता. त्यानुसार मुख्यमंत्री रेड्डी यांनी या जिल्ह्याला भेट दिली आणि दोनच दिवसांनी जिल्ह्याचा नामविस्तार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर कोनासीमा जिल्हा असं केलं.

परिवहन मंत्र्यांचं घर जाळलं

कोनासीमा हा पूर्व गोदावरी जिल्ह्यातील एक भाग असून तो आता नवा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला आहे. अमलापुरम या लोकसभा मतदारसंघाचा हा नवा जिल्हा एक भाग आहे. हा मतदारसंघ अनुसुचित जातीसाठी राखीव असून या भागात दलित सामाज मोठ्या प्रमाणावर आहे. २,०८१ स्क्वेअर किमी भागात या सामाजाचं प्राबल्य असून त्यांची लोकसंख्या सुमारे १७ लाख इतकी आहे. अमलापुरम विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व पिनेपी विश्वरुप हे करत असून ते आंध्रच्या सरकारमध्ये परिवहन मंत्री आहेत.

Web Title: Name Of B R Ambedkar Given To Konaseema District Of Ap Minister House Set On Fire

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top