

Uttar Pradesh government’s Nandini Krushak Samruddhi Yojana
esakal
पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून ‘नंदिनी कृषक समृद्धी योजना’ राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत उच्च दुग्धउत्पादन देणाऱ्या देशी गाईंची डेअरी सुरू करण्यासाठी पशुपालक आणि शेतकऱ्यांना मोठे आर्थिक पाठबळ दिले जाते. २५ गाईंचे डेअरी युनिट उभारण्यासाठी कमाल ३१ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते.