
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाल राष्ट्रीय पुरस्कार समारंभानिमित्त विविध विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून 2022 आणि 2021 या वर्षांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (PMRBP) पुरस्कार जाहीर केले. आणि विजेत्यांना डिजिटल प्रमाणपत्रे प्रदान केली. यावेळी एका मुलाने मोदींना रामायण ऐकवून अचंबित केलं.
जगातील सर्व मोठ्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण भारतीय आहेत. स्टार्टअप्सच्या दुनियेत तरुणाई चांगली कामगिरी करताना आपण पाहतोय, असं पंतप्रधान म्हणाले. जेव्हा आपण आपल्या तरुणांना नवनवीन कामं करताना, देशाला पुढे नेतांना पाहतो तेव्हा अभिमान वाटतो, अशी भावना नरेंद्र मोदींनी व्यक्त केली.
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार कार्यक्रमादरम्यान मोदींनी एका विजेत्याला प्रश्न विचारला. या विद्यार्थ्याने बालमुखी रामायण लिहिलं आहे. तो व्याख्यानं देखील देतो. "तुम्ही बालमुखी रामायणही लिहिलं आहे... खूप काम केलंय...बालपण राहिलंय की तेही गेलंय? असा प्रश्न पंतप्रधानांनी विचारला.
यावर मध्य प्रदेशच्या अवी शर्माने जे उत्तर दिलं, त्यावर मोदी अवाक झाले. अवी शर्माने उत्तर देताना भगवदगीतेतील सातवा अध्याय वाचायला सुरुवात केली. गीतेमुळे आयुष्य सुकर झाल्याचं त्याने म्हटलं. लॉकडाऊनच्या काळात सर्वजण घरी असताना केंद्र सरकारने रामायणाचे जुने एपिसोड पुन्हा दाखवले होते. यातून प्रेरणा मिळाल्याचं अवीने सांगितलं. तरुण पिढी रामाला विसरत चालली आहे. त्यामुळे मी 250 शब्दात रामायण लिहिण्याचं ठरवलं, असं त्याने म्हटलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.