Onion Export Ban Lift: मोदी सरकारचा मोठा निर्णय... कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली

Onion Export Ban Lift: देशातील कांद्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने त्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती
Onion Export Ban Lift
Onion Export Ban Lift

Onion Export Ban Lift: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे आहे. केंद्र सरकाने कांदा निर्यातीवरली बंद हटवली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कांदा निर्यातीला मंजुरी दिली आहे.

देशातील कांद्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने त्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती आणि 31 मार्च 2024 ही अंतिम मुदत ठेवली होती, परंतु ही बंदी अंतिम मुदत संपण्यापूर्वीच हटवण्यात आली आहे. (Onion Price Latest News)

गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीय याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. बंदी हटवण्याचे कारणाबद्दल बोलायचे झाल्यास गुजरात आणि महाराष्ट्राती कांद्याचा स्टॉक पाहात सरकारकडून निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविय यांनी कंद्रीय गृहमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या स्थितीबद्दल माहिती दिली होती,यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Onion Export Ban Lift
EWS आरक्षण जनरल कॅटेगरीच्या लोकांनाच का? हायकोर्टाने नोटीस पाठवत केंद्राला मागितलं उत्तर

यापूर्वी देखील केंद्र सरकार कांद्याच्या निर्यातीवरी बंदी हटवण्याची शक्यता असल्याचे सांगतले जात होते. कांद्याच्या किमती कोसळल्यानं देखील निर्यातबंदीचा निर्णय मागे घेतला असल्याचे सांगितले जात आहे. आता केंद्रीय मंत्री समितीने बंदी हटवण्यासोबतच तीन लाख मेट्रीक टन कांदा निर्यातीला देखील मंजूरी दिली आहे. यासोबत बांग्लादेश मध्ये देखील ५० हजार टन कांदा निर्यात (Onion Export) करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Onion Export Ban Lift
Riteish Deshmukh: वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखला अश्रू अनावर; मोठ्या भावाने येऊन सावरलं, आईच्या डोळ्यातही अश्रू

कांद्याचे कमी उत्पादन आणि भरमसाठ वाढलेल्या किंमतींमुळे केंद्र सरकारने डिसेंबर महिन्यात ८ तारखेला कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ३१ मार्च २०२४ पर्यंत ही बंदी असल्याचे सांगण्यात आले होते. डिसेंबर महिन्यात कांद्याच्या किमती वेगाने वाढल्या होत्या. कांदा १०० रुपये किलो विकला जात होता. यानंतर सरकारच्या प्रयत्नानंतर कांद्याच्या किंमती कमी झाल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com