esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

"७० वर्षांत जे साध्य केलं, त्याहून जास्त मागील २ वर्षात झालं"

sakal_logo
By
ओमकार वाबळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीनिमित्त जल जीवन मिशन या विषयावर ग्रामपंचायती आणि जलसमितींशी संवाद साधला. भारतात जवळजवळ प्रत्येक घरात आता नळाचे पाणी उपलब्ध आहे, मागील ७० वर्षात जे काही साध्य केलं, त्यापेक्षा कितीतरी जास्त मागील दोन वर्षात मिळवल्याचं मोदी म्हणाले.

लोकांना पाणी वाचवण्याचे आवाहन त्यांनी केलं. देशातील 80 जिल्ह्यांतील 1.25 लाख गावांमधील प्रत्येक घरात आता नळाचे पाणी पोहोचल्याची माहिती मोदी यांनी दिली. स्वातंत्र्यापासून 2019 सालापर्यंत देशातील फक्त 3 कोटी घरांना नळाचे पाणी उपलब्ध होते. मात्र, हे मिशन सुरू झाल्यापासून 5 कोटी घरांमध्ये पाईपद्वारे जोडणी करून पाणीपुरवठा करण्यात आल्याची माहिती मोदी यांनी दिली.

सर्वसामान्यांमध्ये जागरुकता येण्यासाठी तसेच या मोहिमेअंतर्गत येणाऱ्या योजनांमधे पारदर्शकता आणण्यासाठी पंतप्रधान जल जीवन मिशन ॲपचेही उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान राष्ट्रीय जल जीवन कोष याचाही प्रारंभ करण्यात आला. याअंतर्गत भारतातील किंवा परदेशातील कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा कंपनी भारतातील ग्रामीण भागात नळाचे स्वच्छ पाणी पोहोचवण्यासाठी मदत करू शकते.

देशभरात सर्वत्र जल जीवन संदर्भात ग्राम सभांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. ग्रामसभेत ग्रामीण पाणीपुरवठा प्रणाली नियोजन आणि व्यवस्थापन तसेच दीर्घकालीन पाणी सुरक्षितता यावर देखील चर्चा झाली.

loading image
go to top