Leader of NDA: मोदीच पंतप्रधान! चंद्राबाबूनी केले अच्छे दिनचे तोंड भरून कौतुक, दिले प्रस्तावाला अनुमोदन

Modi selected as leader of NDA: सध्या किंममेकरच्या भूमिकेत असलेल्या तेलुगु देसम पार्टीच्या चंद्राबाबू नायडू यांनी देखील मोदींच्या नावाच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले आहे.
Chandrababu naidu
Chandrababu naidu

नवी दिल्ली- नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या बैठकीमध्ये एनडीएच्या नेतेपदी निवड झाली आहे. नरेंद्र मोदी ९ जून रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतील. संसदेमध्ये मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला एनडीएतील सर्व नेत्यांनी अनुमोदन दिले आहे. सध्या किंममेकरच्या भूमिकेत असलेल्या तेलुगु देसम पार्टीच्या चंद्राबाबू नायडू यांनी देखील मोदींच्या नावाच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले आहे.

चंद्राबाबू नायडू यांनी यावेळी नरेंद्र मोदी यांचे तोंडभरुन कौतुक केले. नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता मिळण्यास भाग्य लागलं. देशाला एक चांगली संधी मिळाली आहे. अशी संधी पुन्हा येणार नाही. या महान देशाचे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी नेतृत्त्व करतील. त्यांच्या नेतृत्त्वात देश प्रगती करत राहील. आमचा त्यांना पाठिंबा असेल, असं चंद्राबाबू नायडू म्हणाले.

Chandrababu naidu
NDA Government: मोदी सरकार 3.0 चा फॉर्म्युला ठरला! जेडीयू-टीडीपीचे किती असतील मंत्री? छोट्या पक्षांचाही भाव वाढला

गेल्या तीन महिन्यांपासून मोदींनी विश्रांती घेतली नाही. दिवसरात्र ते काम करत आहेत. त्यांची उर्जा थोडी देखील कमी झाली नाही. त्यांच्या सभेमुळे आम्हाला राज्यात जिंकण्यासाठी मोठी मदत झाली. त्यांच्यामुळेच राज्यातील लोकांमध्ये सकारात्मकता निर्माण झाली. एनडीए सरकार देशाला ग्लोबल पॉवर हाऊसमध्ये बदलत आहे. मी अनेक नेते पाहिले आहेत. पण, आता जी देशाची स्थिती आहे. याचे सर्व श्रेय मोदींचे आहे, असं नायडू म्हणाले.

मोदींच्या नेतृत्त्वात आपण पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो आहोत. येत्या काळात त्यांच्या नेतृत्त्वात आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होऊ. विकसित भारताचे त्यांनी स्वप्न पाहिले आहे. हे मोदींच्या नेतृत्त्वात होणार आहे. जगात भारत पहिल्या क्रमांकावर येईल. मोदींनी देशाचं हित नेहमी पुढे ठेवले आहे, असं चंद्राबाबू म्हणाले.

Chandrababu naidu
NDA Meeting Delhi : बैठकीसाठी येताच मोदींनी संविधानावर डोकं टेकवलं; पाहा Video

मी अनेक सरकारे पाहिले आहेत. पण, मोदींकडे ध्येय आहे आणि ते पूर्ण करण्याची त्यांच्यात ताकद आहेत. योग्य वेळेला योग्य नेता आपल्याला मिळाला आहे. मोदींच्या नेतृत्त्वात भारताने सर्वाधिक आर्थिक वाढ पाहिली आहे. मी अभिमानाने सांगतो की आमचा मोदींना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा आहे. 'सबका साथ, सबका विकास' या त्यांच्या घोषणेशी आम्ही सहमत आहोत, असंही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com