Narendra Modi: भारताच्या विकासगाथेचा लाभ घ्या, पंतप्रधान मोदींचे अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यांना आवाहन!sakal
देश
Narendra Modi: भारताच्या विकासगाथेचा लाभ घ्या, पंतप्रधान मोदींचे अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यांना आवाहन!
Latest USA News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील भारतीय समुदायाशीही संवाद साधला.
Modi Usa Visit: ‘‘येत्या काही काळातच भारत हा जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. त्यामुळे आमच्या या विकासगाथेचा अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यांनी लाभ उठवावा,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. मोदी यांनी अमेरिकेतील काही बड्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केली.
मोदी म्हणाले,‘‘अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपाननंतर भारत हा सध्या जगातील पाचवी अर्थव्यवस्था आहे. आमचा ‘जीडीपी’ ३.९ ट्रिलियन डॉलर आहे. सलग तिसऱ्या वर्षी भारताचा विकासाचा वेग सात टक्क्यांहून अधिक राहिला आहे.

