नरेंद्र मोदी अंघोळ कुठे करतात माहित आहे का?

वृत्तसंस्था
Friday, 29 November 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱयावरून विरोधक टिका करताना दिसतात. मात्र, मोदी हे अहोरात्र काम करत असून, वेळेची बचत करत असतात. परदेश दौऱयावर असताना मोदी विमानतळावरच विश्रांती घेतात आणि तेथेच अंघोळ करतात, असे गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत सांगितले.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱयावरून विरोधक टिका करताना दिसतात. मात्र, मोदी हे अहोरात्र काम करत असून, वेळेची बचत करत असतात. परदेश दौऱयावर असताना मोदी विमानतळावरच विश्रांती घेतात आणि तेथेच अंघोळ करतात, असे गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत सांगितले.

लोकसभेत एसपीजी विधेयकावरून गदारोळ झाला. शिवाय, गांधी कुटुंबीयांच्या एसपीजी सुरक्षाही काढून घेण्यात आली. या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना शहा म्हणाले, नरेंद्र मोदी जेव्हा बाहेरच्या देशात जातात त्यावेळी विमान इंधन भरण्यासाठी विमानतळावर थांबते. विमान इंधन भरायला गेले की तेवढ्या वेळेत मोदी विमानतळावरच विश्रांती घेऊन अंघोळ करतात. ते कधीच हॉटेलमध्ये विश्रांती करायला जात नाहीत. परदेश दौऱ्यात त्यांनी सोबत नेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही 20 टक्के कमी केली आहे. सोबतच्या अधिकाऱ्यांना स्वतंत्र गाड्यांऐवजी एकत्र प्रवास करण्यासही सुचवले. यामुळे लागणारी सुरक्षा व्यवस्था आणि इतर गोष्टींवर होणारा खर्च कमी झाला आहे.'

दरम्यान, देशात एसपीजी सुरक्षा पंतप्रधानांशिवाय गांधी कुटुंबातील तिघांना पुरवली जात होती. ऑगस्टमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची एसपीजी सुरक्षा काढून घेण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचीही सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: narendra modi takes bath airport instead of going hotel says amit shah