esakal | G20 Summit | पंतप्रधान मोदी जी-२० परिषदेला संबोधणार, अफगाणिस्तान केंद्रस्थानी
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

पंतप्रधान मोदी जी २० परिषदेला संबोधणार, अफगाणिस्तान केंद्रस्थानी

sakal_logo
By
ओमकार वाबळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी -20 शिखर परिषदेत जगभरातील महत्वाच्या देशांना संबोधणार आहेत. अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी इटलीच्या पुढाकाराने या शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. जी-२० मध्ये जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांचे प्रमुख उपस्थित असतील. मानवी मुल्यांची गळचेपी आणि दहशतवाद्यांच्या सावटाखाली असणाऱ्या या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे.

पंतप्रधान मोदींनी याआधीच अफगाणिस्तानला मानवी मुल्यांच्या संरक्षणासाठी मदत करण्याची भारताची तयारी दर्शवली होती. यासाठी वचनबद्ध असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले होते. अफगाणिस्तानातील वाढती दहशतवादाची जोखीम ओळखून जी-२० शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. भारताने अफगाणिस्तानला मदत आणि सहकार्य करण्यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे.

loading image
go to top