जागतिक कोविड शिखर परिषदेला सुरुवात, अमेरिकेच्या निमंत्रणानंतर मोदींची उपस्थिती

pm modi to participate in second global covid virtual summit on Joe Biden invitation
pm modi to participate in second global covid virtual summit on Joe Biden invitation sakal

कोरोना आल्यानंतर जागतिक पातळीवर सर्व राष्ट्रांनी सोबत येत काम करण्याची गरज पहिल्या टप्प्यापासून होती. यासाठी जागतिक कोविड शिखर परिषदेची सुरुवात करण्यात आली. आज या परिषदेची दुसरी व्हर्चुअल बैठक पार पडणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिलेल्या निमंत्रणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. (World COvid Summit 2022)

कोविड महामारीच्या सततच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि मजबूत जागतिक आरोग्य सुरक्षा संरचना तयार करण्याचा या परिषदेचा मानस आहे. (Narendra Modi will Attend World Covid Summit 2022)

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान शिखर परिषदेच्या सुरुवातीच्या सत्रात 'साथीचा रोग थकवा रोखणे आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणे' या विषयावर भाष्य करणार आहेत. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ६.३० ते ७.४५ या दरम्याने याचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे.

इतर सहभागी देश या कार्यक्रमाचे सह-यजमान आहेत. CARICOM चे अध्यक्ष म्हणून बेलीझचे प्रमुख, आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष म्हणून सेनेगल, G20 चे अध्यक्ष म्हणून इंडोनेशिया आणि G7 चे अध्यक्ष म्हणून जर्मनी हे देश उपस्थिती लावतील. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक आणि इतर मान्यवरही यात सहभागी होणार आहेत.

सप्टेंबर २०२१ मध्ये बायडेन यांनी आयोजित केलेल्या पहिल्या ग्लोबल कोविड व्हर्च्युअल समिटमध्येही पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. सुरक्षित व परवडणाऱ्या लसी आणि औषधांचा पुरवठा करून साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

चाचणी आणि उपचार, जीनोम्सवर पाळत ठेवणे आणि आरोग्य सेवा कर्मचार्‍यांसाठी अतिरिक्त क्षमता निर्माण करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या जोडीने काम करण्यावर भारताचा भर असल्याचं याआधीही त्यांनी स्पष्ट केलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com