BJP National Meeting : 2024 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील; अमित शहांचं मोठं वक्तव्य

पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनतेनं चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
BJP National Executive Meeting
BJP National Executive Meetingesakal
Summary

या वर्षी त्रिपुरा, नागालँड, मेघालय, कर्नाटक, मिझोराम, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

BJP National Executive Meeting : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आजपासून सुरू होत आहे. या बैठकीपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान पदाबाबत (Amit Shah) मोठं वक्तव्य केलंय.

अमित शहा म्हणाले, 'गुजरातमधील विधानसभा निवडणुकीचे (Gujarat Assembly Election) निकाल अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे निकाल गुजरातसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाचे आहेत. 2024 मध्ये नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत, असा स्पष्ट संदेश गुजरात निवडणुकीच्या निकालानं दिलाय. हा काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला संदेश आहे. गुजरातच्या जनतेनं पुन्हा एकदा भाजपला मदत करून विक्रमी बहुमत मिळवून दिलंय.'

BJP National Executive Meeting
Winter Session : भाजप आमदारांचं अनोखं आंदोलन; ऑक्सिजन सिलेंडर घेऊन पोहोचले थेट विधानसभेत!

पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनतेनं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. जातीवादाचं विष संपवण्याचं काम गुजरातच्या जनतेनं केलंय. पोकळ आश्वासनं देऊन त्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना गुजरातच्या जनतेनं थप्पड मारलीये, अशा शब्दात शहांनी काँग्रेस-'आप'ला चांगलंच सुनावलं.

BJP National Executive Meeting
Terror Attack Alert : प्रजासत्ताक दिनी अनेक शहरं उद्ध्वस्त करण्याचा कट, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीरपासून कन्याकुमारी, द्वारका ते कामाख्यापर्यंत नरेंद्र मोदी हे निर्विवाद नेते आहेत आणि 2024 मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान होतील, हा अतिशय स्पष्ट संदेश आहे असंही शहा म्हणाले. या वर्षी त्रिपुरा, नागालँड, मेघालय, कर्नाटक, मिझोराम, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याशिवाय जम्मू-काश्मीरमध्येही निवडणुका होऊ शकतात. त्याच पार्श्वभूमीवर शहांचं वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com