'नरेंद्र मोदींनी कधी चहा विकला?'

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

तिरुवनंतपुरम: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधी चहा विकला? त्यांनी कधीही चहा विकला नसून, ते फक्त प्रसारमाध्यमांच्या प्रचारामुळे पंतप्रधान झाले आहेत. पुन्हा ते पंतप्रधान होणार नाहीत, असे भारतीय जनता पक्षाचे खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे.

तिरुवनंतपुरम: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधी चहा विकला? त्यांनी कधीही चहा विकला नसून, ते फक्त प्रसारमाध्यमांच्या प्रचारामुळे पंतप्रधान झाले आहेत. पुन्हा ते पंतप्रधान होणार नाहीत, असे भारतीय जनता पक्षाचे खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे.

काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या ‘दी पॅराडॉक्सिकल प्राइम मिनिस्टर, नरेंद्र मोदी अँड हिज इंडिया’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी (ता. 24) झाले. या कार्यक्रमावेळी शत्रुघ्न सिन्हा उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदी यांच्यावर टी करताना सिन्हा म्हणाले, मला अनेक लोक विचारतात तुम्ही कलाकार आहात, तुम्हाला नोटाबंदी आणि जीएसटीमधलं काय कळतं? जर वकील अनुभव नसताना आर्थिक मुद्द्यांवर बोलतो, टीव्हीवरची कलाकार केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री होते, एक चहा विकणारा माणूस… अर्थात मोदींनी कधीही चहा विकलाच नाही. मोदी फक्त मीडियाच्या जोरावर आणि प्रचारावर पंतप्रधान झाले. ते जर काहीही बोलू शकतात तर मी नोटाबंदी किंवा जीएसटी या मुद्द्यांवर का बोलू शकत नाही? माझे नरेंद्र मोदींशी व्यक्तीगत शत्रुत्त्व नाही. मात्र, वन मॅन शो आणि टू मॅन आर्मीला मी कंटाळलो आहे.'

कोणत्याही लोकशाही देशात एखादा पक्ष एखाद्या माणसामुळे मोठा होतो. मात्र, देश हा पक्षापेक्षा मोठा असतो हे मोदींनी विसरू नये. मी जे म्हणतो आहे त्यावर मी ठाम आहे, मी राष्ट्रहिताबाबत बोलतो, असेही सिन्हा यांनी बोलताना मोदी व अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तम वक्ते आहेत. परंतु, देशात एखाद्या दलित किंवा मुस्लिम व्यक्तीवर हल्ला होतो किंवा त्याला ठार केले जाते तेव्हा मात्र मोदी मूग गिळून गप्प बसतात, अशी टीका थरुर यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi will not become Prime Minister again says Shatrughan Sinha