

Sail to Statue of Unity! New Luxury Cruise Service with Water Sports Announced
esakal
मध्यप्रदेश पर्यटन विभागाने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एक मोठा आणि रोमांचक निर्णय घेतला आहे. आता नर्मदा नदीच्या संथ पाण्यातून गुजरातच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'पर्यंत क्रूझने प्रवास करणे शक्य होणार आहे. मध्यप्रदेशातील बडवानी ते गुजरातमधील केवडिया असा १३५ किलोमीटरचा हा प्रवास पर्यटनाला नवी दिशा देणारा ठरेल.