नासाचे 'पार्कर सोलर प्रोब' झेपावले अंतराळात 

वृत्तसंस्था
रविवार, 12 ऑगस्ट 2018

'पार्कर सोलर प्रोब' या पहिल्या मानवविरहित यानाच्या प्रक्षेपणास तांत्रिक बिघाडाचे ग्रहण लागले होते. 'नासा'चे हे यान अवकाशात झेपावण्यासाठी अवघे 55 सेकंद शिल्लक राहिले असताना प्रक्षेपण नियंत्रकाच्या कक्षातून ''होल्ड, होल्ड, होल्ड' असा आवाज आला होता. त्यामुळे या यानाने प्रक्षेपण थांबवण्यात आले होते.

नवी दिल्ली : 'नॅशनल अॅरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन'चे (नासा) 'पार्कर सोलर प्रोब' हे यान आज (रविवार) अंतराळात यशस्वीपणे झेपावले आहे. सूर्याच्या दिशेने झेपावून लाखो किलोमीटरचे अंतर पार करण्याची क्षमता या यानामध्ये आहे. तसेच हे यान पहिले मानवविरहित यान असल्याने याला मोठे महत्व असे प्राप्त झाले आहे.

'पार्कर सोलर प्रोब' या पहिल्या मानवविरहित यानाच्या प्रक्षेपणास तांत्रिक बिघाडाचे ग्रहण लागले होते. 'नासा'चे हे यान अवकाशात झेपावण्यासाठी अवघे 55 सेकंद शिल्लक राहिले असताना प्रक्षेपण नियंत्रकाच्या कक्षातून ''होल्ड, होल्ड, होल्ड' असा आवाज आला होता. त्यामुळे या यानाने प्रक्षेपण थांबवण्यात आले होते. या प्रक्षेपणादरम्यान 'हेलियम सिस्टीम'मधील बिघाड कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे काल (शनिवार) होणारे प्रक्षेपण आज घेण्यात आले. त्यानंतर आज या यानाचे प्रक्षेपण यशस्वीपणे घेण्यात आले. 

Web Title: NASAs Parker Solar Probes are in Space

टॅग्स