मोदी आणि नथुराम एकाच विचाराचे : राहुल गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 जानेवारी 2020

नथुराम गोडसे गांधींजींना गोळी मारत असताना त्याचे डोळे झाकले, कारण त्याला माहिती होते आपण कोणाला गोळी मारत आहे. अनेक जणांना याबाबत माहिती नाही. भारतीयत्व सिद्ध करा म्हणणारे मोदी कोण?

वायनाड : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नुथराम गोडसे एकाच विचाराचे आहेत. मोदी आणि नथुरामामध्ये फक्त एकच फरक आहे तो म्हणजे नथुराम आवडतो असे म्हणण्याची मोदींमध्ये हिंमत नाही, अशी जहरी टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 72 व्या पुण्यतिथीनिमित्त वायनाड येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी मोदी आणि भाजपला लक्ष्य केले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी, काश्मीरमधील परिस्थिती, आसाममधील हिंसाचार अशी विविध मुद्द्यांवरून त्यांनी केंद्राला प्रश्न विचारले.

राहुल गांधी म्हणाले, की नथुराम गोडसे गांधींजींना गोळी मारत असताना त्याचे डोळे झाकले, कारण त्याला माहिती होते आपण कोणाला गोळी मारत आहे. अनेक जणांना याबाबत माहिती नाही. भारतीयत्व सिद्ध करा म्हणणारे मोदी कोण? बेरोजगारी आणि नोकऱ्यांबद्दल विचारले की मोदी मुद्दा दुसरीकडे वळवितात. सीएए, एनआरसीमुळे नोकऱ्या निर्माण होणार नाहीत. काश्मीर आणि आसाम खदखदता ठेवून युवकांना नोकऱ्या निर्माण होणार नाहीत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nathuram Godse and Narendra Modi Believe in Same Ideology Says Rahul Gandhi