modi and yogi adityanath mahatma gandhi death anniversary
sakal
शुक्रवारी ३० जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी देशभर 'हुतात्मा दिन' म्हणून पाळला गेला. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बापूंना विनम्र अभिवादन केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दोन्ही नेत्यांनी गांधीजींच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली.