
तिरंगा फडकावल्यावर होणार फुलांची बरसात; पहिल्यांदाच दिसणार असं दृश्य
नवी दिल्ली : देशभरात १५ ऑगस्ट रोजी ७५ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मात्र, यावेळचा स्वातंत्र्यदिन आणखी काही कारणांसाठी वेगळा ठरणार आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, उद्या १५ ऑगस्ट रोजी जेंव्हा पंतप्रधान मोदी राष्ट्रध्वज फडकावतील तेंव्हा आकाशातून दोन Mi-17 1V हेलिकॉप्टर्समधून फुलांचा वर्षाव करण्यात येणार आहे. Mi-17 1V एक शक्तीशाली हेलिकॉप्टर आहे. यामध्ये एवियोनिक्स, ग्लास कॉकपिट इन्स्ट्रूमेंटेशन, अत्याधुनिक नौवहन उपकरण इत्यादी फिचर्स आहेत.
हेही वाचा: मोदी सरकार स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीपेक्षा 'फाळणी'ला अधोरेखित का करतंय?
हेही वाचा: गडकरींच्या पत्रानंतर ऑडिओ क्लीप व्हायरल, ठेकेदारांना धमकाविताना खासदाराचा उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या १५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावतील. त्यानंतर ते देशाला उद्देशून संबोधन करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करण्यासाठी मार्च २०२१ मध्ये गुजरातमधील साबरमती आश्रमामधून 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' समारोहाची सुरुवात केली होती.
14 ऑगस्टला 'फाळणी भयावह स्मरण दिवस'
स्वातंत्र्याच्या आदल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फाळणीच्या दिवसाची आठवण काढली. देशाच्या फाळणीला कधीही विसरले जाऊ शकत नाही. द्वेष आणि हिसेंमुळे आपल्या लाखो लोकांना स्थलांतरित व्हावं लागलं. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्या लोकांचा संघर्ष आणि त्यागाच्या आठवणीत 14 ऑगस्टला 'फाळणी भयावह स्मरण दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं मोदी म्हणालेत. त्यांनी ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. #PartitionHorrorsRemembranceDay हा दिवस आपल्याला भेदभाव, द्वेष आणि वैर या विषाला नष्ट करण्यासाठी केवळ प्रेरित करणार नाही, तर एकता, सामाजिक सद्भावना आणि मानवी संवेदना मजबूत करण्यासाठी मदत करेल. ट्विट करुन पंतप्रधान मोदींनी याबाबत माहिती दिली. देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिवस उद्या साजरा केला जाणार आहे.
Web Title: National Flag Narendra Modi At The Independence Day Celebrations Flower Petals Will Be Showered
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..