
नवी दिल्ली : सरत्या आर्थिक वर्षात राष्ट्रीय महामार्ग बांधणीचे काम मंदावले असल्याची माहिती केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रतिदिवस ३४ किलोमीटर इतक्या वेगाने रस्ते बांधणीचे काम झाले होते. त्या तुलनेत गतवर्षी २९ किलोमीटर प्रतिदिवस इतक्या वेगाने रस्ते बांधणीचे काम झाल्याचे गडकरी म्हणाले.